Anganwadi recruitment 2023 : महाराष्ट्रातील हजारो महिलांना अंगणवाडीमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे महाराष्ट्रात दोन लाख पदांना मंजूर देण्यात आली आहे. त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
नवीन शैक्षणिक राष्ट्रीय धोरणात असे सांगण्यात आले आहे अंगणवाड्यांमधील सर्व रिक्त पदे भरण्यास मदत करण्यासाठी प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शिक्षणावर अधिक लक्ष दिले जाणार आहे
गावगावा मध्ये अंगणवाड्या उभारण्याचा सरकारचा विचार आहे यामुळे २०,००० नवीन रोजगार निर्माण होतील. तसेच नव्याने सुरु होणाऱ्या अंगणवाडीसाठी खेड्यांमध्ये शिक्षित महिलानां नोकरी भेटणार आहे.
महाराष्ट्रात 97 हजार 475 अंगणवाडी सेविका तर 13 हजार 11 मिनी अंगणवाडी सेविका आणि 97 हजार 475 अंगणवाडी मदतनीस अशी सुमारे 2 लाख 7 हजार पदे मंजूर आहे.
महाराष्ट्रात अंगणवाडी सेविकांसाठी 2,711 पदे, मिनी अंगणवाडी सेविकांची 626 पदे आणि अंगणवाडी मदतनीसांची 15,466 पदे आहेत. मात्र, यापैकी 20,601 पदे सध्या रिक्त आहेत. ही पदे मे अखेरपर्यंत भरण्याचे निर्देश राज्याने दिले आहेत.
(HSC) 12 उत्तीर्ण असल्यास अंगणवाडी भारती २०२३ प्रक्रियेत घेता येणार भाग
अंगणवाडी सेविका होण्यासाठी, तुमचे (HSC) 12 वी इयत्तेचे शिक्षण किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे आणि तुमचे वय किमान जास्तीत जास्त 35 वर्षे असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा इतर उच्च शिक्षण असल्यास, भरती प्रक्रियेतील तुमचा स्कोअर तुमच्या वयापेक्षा जास्त महत्त्वाचा असेल. आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही गावातील स्थानिक रहिवासी असल्यास, तुम्हालाही प्राधान्य दिले जाईल.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेतून किमान 20 हजार महिलाना मिळणार नोकरी
२०२३ नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात देशातील अंगणवाड्या अद्ययावत आणि सुधारण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे सरकारने २०१७ च्या अखेरीस २०,००० रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका (काळजीवाहू) पदे भरण्याचे ठरवले आहे. एकात्मिक बाल विकास विभागाने (ICDS) ही पदे ३१ मे महिन्यापूर्वी भरण्याचे निर्देश दिले आहेत.