इंडियन ऑईलमध्ये बंपर भरती; ग्रॅज्युएट असाल तर मिळेल २५,००० ते १००,००० पगाराची ऑफर

Indian Oil मध्ये उपलब्ध असलेल्या जागांचे माहिती , पात्रतेचे काय, शैक्षणिक पात्रता, व या पदांसाठी वेतन रचना याविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

IOCL Recruitment: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने पदवीधर लोकांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया हि दिलेल्या लिंक वरून  ऑनलाईन असेल.  तब्बल ५१८ पदांसाठी ही बंपर भरती असणार आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख सोमवार २० मार्च २०२३ असणार आहे. उपलब्ध जागांचे माहिती, पात्रतेचे काय, शैक्षणिक पात्रता, व या पदांसाठी वेतन रचना याविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. १ मार्च पासून हे अर्ज सुरु होणार आहेत.

अर्ज करण्यापूर्वीच जाणून घ्या की, तुम्हाला अर्जासह खालील कागदपत्रे जोडावी लागणार आहेत.

  • बायोडेटा
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं,
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

इंडियन ऑईल रिक्त जागा (Indian Oil Vacant Jobs)

  • कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक
  • कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक
  • कनिष्ठ साहित्य सहाय्यक
  • कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Diploma in relevant field पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक –संबंधित पदांनुसार B.Sc. in Physics, Chemistry/ Industrial Chemistry पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ साहित्य सहाय्यक – Diploma in Mechanical/Electrical/Instrumentation Engg. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक – B.Sc. (Nursing) or 3 years Diploma in Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक – दरमहा 25,000 – 1,05,000/- रुपये

कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक – दरमहा 25,000 – 1,05,000/- रुपये

कनिष्ठ साहित्य सहाय्यक – दरमहा 25,000 – 1,05,000/- रुपयेकनिष्ठ नर्सिंग सहाय्यक – दरमहा 25,000 – 1,05,000/- रुपये

Leave a Comment